
नाशिक, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।
- महिलांचे स्री बीज तस्करी प्रकरणी ठाण्यातील बदलापूर मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासा या सर्व प्रकरणाचे धागेदोरे नाशिक शहरापर्यंत आले असून या आय व्ही एफ सेंटरला महानगरपालिकेच्या वतीने नोटीस देखील पाठविण्यात आली आहे त्यामुळे नाशिक सह संपूर्ण राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्री बीज तस्करी करून ज्या परिवाराला मुलं होत नाही त्यांना देशात आणि विदेशात देऊन त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशाच्या व्यवहार केला जात होता. सर्व गोरख धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू होता. गरजू गरीब आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांचा यासाठी वापर केला जात असल्याचे समोर आले आहेत. मागील आठवड्यामध्ये ठाण्यातील बदलापूर येथे एका रुग्णालयात एका महिलेला घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्या महिलेचे बीज अंकुरे काढून घेऊन त्याबाबत एक सौदा केला जात असल्याची माहिती येथील उपप्रथमिक रुग्णालयाला मिळाल्यानंतर येथील सरकारी डॉक्टरांनी पोलिसांच्या मदतीने मदतीने एका घरावरती छापा मारून याबाबत कारवाई केली होती या कारवाईनंतर या ठिकाणी तपास केला जात असताना पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती मिळाली त्यामध्ये पोलिसांनी स्त्री बीज तस्करी प्रकरणात ठाण्यातील काही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी देखील केली होती त्यातून मिळालेल्या धक्कादायक माहिती मध्ये एका आलिशान इमारती त राहून यास बीज तस्करी प्रकरणात व्यवहार होत असल्याचे समोर आले.
या सर्व प्रकरणांमध्ये ठाण्यातील पोलिसांनी तपास करत असताना अनेक धक्कादायक माहिती आली. त्या धक्कादायक माहिती मध्ये नाशिक शहरात असलेल्या एका आय व्ही एफ सेंटरचा संबंध असल्याचे समोर आले त्यानंतर ठाणे पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने मुंबई आग्रा महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याच्या जवळपास असलेल्या पेट्रोल पंपा जवळील एका आय व्ही एफ सेंटरमध्ये छापा टाकून यातील कागदपत्र जप्त केली आहे या ठिकाणी अजून काही माहिती गोळा केली असून या ठिकाणी काम करणाऱ्या कामगार आणि डॉक्टरांचे जबाब देखील ठाणे पोलिसांनी नोंदवल्याचे सांगितले जात आहे .
ही सर्व घटना समोर आल्यानंतर नाशिक महानगरपालिका देखील सावध झाली असून ही माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने या आय व्ही एफ सेंटरला नोटीस दिली असून ठाणे महानगरपालिकेने देखील याबाबतची नोटीस दिल्याचे सांगण्यात येत आहे यामुळे या सर्व स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकचे नाव आल्यामुळे चांगलीच खळब उडाली असून आता ठाणे पोलीस या सर्व प्रकरणी राज्यात पण तपास करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV