राष्ट्रीय विकास आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करा - पंतप्रधान
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी (हिं.स.) - राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक कुतूहलाचा उत्सव साजरा करतो, जो आपल्या देशाला पुढे नेत राहतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिले
पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी (हिं.स.) -

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक कुतूहलाचा उत्सव साजरा करतो, जो आपल्या देशाला पुढे नेत राहतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे की, हा दिवस सर सी.व्ही. रमण यांनी लावलेल्या 'रमण इफेक्ट' या क्रांतिकारी शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या शोधामुळे भारतीय संशोधनाला जागतिक नकाशावर भक्कम स्थान मिळाले. आपल्या तरुणांना सक्षम बनवण्याचा, संशोधन परिसंस्था अधिक बळकट करण्याचा आणि राष्ट्र विकास तसेच जागतिक कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आपल्या निर्धाराचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande