
बीड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।
गणिताची आकडेमोड म्हणजे अनेकांसाठी डोकेदुखी असते, पण याच आकड्यांशी मैत्री करत वेदांश युवराज चव्हाण याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे. जीनिअस अबॅकस अकॅडमीतर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये वेदांशने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम श्रेणीसह यश संपादन केले असून, त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आजच्या धावपळीच्या युगात तंत्रज्ञानासोबतच बुद्धीचा कस लागणाऱ्या स्पर्धांचे महत्त्व वाढले आहे. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. मात्र, वेदांशने आपल्या एकाग्रतेच्या आणि अचूकतेच्या जोरावर लेव्हल-१ मध्ये बाजी मारली. अत्यंत कमी वेळात कठीण आकडेमोड करून त्याने परीक्षकांची मने जिंकली. वेदांशने हे यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीची जोड दिली. त्याच्या या यशात त्याच्या मार्गदर्शकांसह पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्याच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis