सोलापूर : परतावा न मिळाल्यास धान्य वाटप बंद
सोलापूर, 01 मार्च (हिं.स.)। नोव्हेंबर-डिसेंबर 2022 चा भरलेला चलनातील परतावा त्वरित न मिळाल्यास जिल्ह्यात धान्य वाटप बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, सोलापूर ग्रामीण ज
सोलापूर : परतावा न मिळाल्यास धान्य वाटप बंद


सोलापूर, 01 मार्च (हिं.स.)। नोव्हेंबर-डिसेंबर 2022 चा भरलेला चलनातील परतावा त्वरित न मिळाल्यास जिल्ह्यात धान्य वाटप बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, सोलापूर ग्रामीण जिल्हा संघटनेच्यावतीने अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांना मंत्रालयात निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव मंडलिक, धान्य दुकानदार अरूण जाधव आणि अक्षय मिले आदी उपस्थित होते.

रेशन दुकानदारांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर 2022 मध्ये चलनाद्वारे रोख रक्कम भरली होती. मात्र, 1 जानेवारी 2023 पासून केंद्र सरकारने मोफत धान्य योजना लागू केल्यामुळे ही रक्कम शासनाकडे जमा राहिली. गेली तीन वर्षे जिल्हा पुरवठा अधिकारी ते मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करूनही हा परतावा मिळालेला नाही. गेल्या चार महिन्यांपासून बसवण्यात आलेल्या नवीन 1 स्कॅनरवर ग्राहकांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत. सर्व्हर डाऊन असल्यामुळे ग्राहकांना तासन्तास ताटकळत राहावे लागते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande