एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये झालेल्या स्फोटात 15 जण ठार
नागपूर, 01मार्च (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुळगांव स्थित एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात 15 जण ठार झावेक. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनेला दुजोरा दिला असून जखमींचा नेम
एसबीएल एनर्जी लि. कंपनी लोगो


नागपूर, 01मार्च (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुळगांव स्थित एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात 15 जण ठार झावेक. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनेला दुजोरा दिला असून जखमींचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

नागपूरच्या कळमेश्वर येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) ही एक प्रमुख औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते. ही कंपनी एकाच व्यवस्थापनाखाली कार्यरत आहे. या कंपनीत आज, रविवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमाराला हा स्फोट झाला. स्फोटाची भीषणता इतकी होती की याचा आवाज दूरवर ऐकू आल्याची स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर देखील घटनास्थळी दाखल झालेत. स्फोटाचे नेमके कारण आणि जखमींचा आकडा याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मदत आणि बचावकार्य प्राथमिकता असून घटनेचा संपूर्ण आढावा घेऊनच आकडेवारी देता येईल पोलिसांनी सांगितले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande