नागपूरच्या आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील भूखंड गैरव्यवहाराची होणार सखोल चौकशी
लातूर, 01 मार्च (हिं.स.) नागपूर ग्रामीणमधील मौजा बेसा येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सार्वजनिक उपयोगाच्या जागेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील


लातूर, 01 मार्च (हिं.स.)

नागपूर ग्रामीणमधील मौजा बेसा येथील आनंद को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सार्वजनिक उपयोगाच्या जागेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी या संस्थेच्या कारभाराबाबत आणि सार्वजनिक जमिनीच्या वाटपाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री महोदय बोलत होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी संबंधित सहायक निबंधकांनी सादर केलेला चौकशी अहवाल, संस्थेचा खुलासा आणि प्राप्त निष्कर्षांची माहिती सभागृहासमोर मांडली.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले की, या संस्थेने हस्तांतरित केलेल्या सात भूखंडांबाबत विशेष चाचणी लेखापरीक्षण (Test Audit) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या लेखापरीक्षण अहवालात जर कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. केवळ संस्थेचे पदाधिकारीच नव्हे, तर या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या किंवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित सहायक निबंधक आणि सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगविषयक कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार आणि प्रविण दटके यांनीही सहभाग घेऊन या प्रकरणातील तांत्रिक बाबींकडे सरकारचे लक्ष वेधले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande