
अकोला, 01 मार्च (हिं.स.)।
अकोला शहराला महान येथील शुध्दीकरण केंद्रावारून पाणी पुरवठा करण्यात येते, तसेच महान ते अकोला दरम्यान पाणी पुरवठा करण्यासाठी 700/600 मि.मि.व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या मुख्य जलवाहिनीवर बार्शिटाकली येथे काही नागरिकांव्दारे अकोला महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अवैधरित्या 50, 40, 25 आणि 20 मि.मि.व्यासाची नळ जोडणी करण्यात आली असून यामधून लाखो लीटर पाण्याची चोरी होत असल्याने आज दि. 1 मार्च 2026 रोजी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या सहकार्याने मनपा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पोलीस दलाच्या उपस्थितीत सदर ठिकाणचे एकुण 62 अवैध नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे