तेल्हारा शेरी फाट्यावर भीषण अपघात-माळेगावच्या तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला, 01 मार्च (हिं.स.)। तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्याजवळ भीषण अपघातात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीला आयशर वाहनाची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार म
Photo


Photo


अकोला, 01 मार्च (हिं.स.)।

तेल्हारा शहराजवळील शेरी फाट्याजवळ भीषण अपघातात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीला आयशर वाहनाची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये

दर्शन रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १६ वर्ष)

साई रामेश्वर वैष्णव (वय अंदाजे १२ वर्ष)

गणेश दीपक आपतुरकर (वय अंदाजे १६ वर्ष)

यांचा समावेश आहे. सुरुवातीला दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर तिसरा गंभीर जखमी झालेल्या मुलाचा तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाल्याचे समजते. दोघे सख्खे भाऊ असल्याची माहितीही समोर येत आहे.

घटनेनंतर संबंधित आयशर वाहन ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी ते तेल्हारा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे. तिघांवरही तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

सदर तिन्ही अल्पवयीन मुले माळेगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती असून ते तेल्हारा येथे येत असतानाच हा अपघात घडल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेमुळे वैष्णव व आपतुरकर कुटुंबियांमध्ये तसेच माळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे, आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande