शीख गुरूंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र आले पाहिजे - अमित शाह
मुंबई, १ मार्च (हिं.स.) : शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे. त्यामुळे शीखांच्या गुरूंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धर्मांतराच्या विरोधात सर्व देशवासीयांनी एकजूट व्हायला हवे
Amit shah kharghar


मुंबई, १ मार्च (हिं.स.) :

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे. त्यामुळे शीखांच्या गुरूंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धर्मांतराच्या विरोधात सर्व देशवासीयांनी एकजूट व्हायला हवे.

शीखांच्या दहा गुरूंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धर्मांतराच्या विरोधात सर्व देशवासीयांनी एकजूट व्हायला हवे, असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

नवी मुंबई, महाराष्ट्र येथे गुरु श्री तेगबहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी दिवस समागम समारंभात गुरु साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून उपस्थित संगतशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीमती सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या संबोधनात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी राष्ट्रीय स्तरावर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांचा 350 वा शहीदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला, जो संपूर्ण भारतासाठी भाग्याचा विषय आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गुरु तेगबहादूर जी यांचे जीवनकार्य तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले. ते पुढे म्हणाले की, जर नववे गुरु तेगबहादूर जी यांनी हिंदू धर्म आणि हिंदूंच्या रक्षणासाठी बलिदान दिले नसते, तर संपूर्ण जगात एकही हिंदू उरला नसता. शाह यांनी नमूद केले की, संपूर्ण भारत आणि जगभरातील सनातन धर्माचे अनुयायी गुरु तेगबहादूर जी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात की, त्यांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी यातना सहन करत आपले बलिदान दिले.

अमित शाह म्हणाले की, शीख परंपरेचा मूळ आधार एकता, बंधुत्व, सर्वसमावेशकता आणि वीरता हा राहिला आहे आणि गुरु ग्रंथ साहिबमध्ये याच तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. ते म्हणाले की, संत नामदेव जी, नरसी मेहता, कबीर जी, संत रविदास जी यांसारख्या अनेक प्रसिद्ध संतांच्या पदांना गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान देण्याचे काम दशम पित्याने केले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, महाराष्ट्र सरकारने अनेक समाजांना गुरु तेगबहादूर जी यांच्या विचारांशी जोडण्याचे काम केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, गुरु नानकदेव जी यांनी मानवतेचे 3 सोपे परंतु सखोल सिद्धांत आपल्याला दिले आहेत - नाम जपो, कीरत करो आणि वंड छको. याचा अर्थ असा की - ईश्वराच्या नामाचा जप करत राहा, त्यांचे कीर्तन करा आणि सोबत मिळून भोजन करा. ते म्हणाले की, हे तत्व परस्पर भागीदारी दर्शवते आणि हीच परंपरा पुढे जाऊन लंगर आणि 'साझा चूल्हा' म्हणजे सामायिक चूल यामध्ये परिवर्तित झाली, ज्यातून मुघलांविरुद्ध लढण्याची एक मोठी शक्ती प्राप्त झाली. शाह यांनी म्हटले की, भारताच्या हजारो वर्षांच्या जुन्या परंपरेला गुरु नानकदेव जी महाराज यांनी नवीन जीवन देण्याचे काम केले आणि गुरु तेगबहादूर जी देखील याच परंपरेचे अनुयायी राहिले.

अमित शाह यांनी सांगितले की, गुरु तेगबहादुरजी यांनी हिंदू धर्म आणि त्याच्या अनुयायांच्या रक्षणासाठी एका क्षणाचाही विलंब केला नाही आणि त्यांनी जे सांगितले ते करून दाखवले. शाह म्हणाले की, जेव्हा काश्मिरी पंडितांवर संकटे आली, तेव्हा सर्व काश्मिरी पंडितांचे प्रतिनिधी एकत्र येऊन गुरु साहेबांसमोर आले आणि संरक्षणाची मागणी केली. तेव्हापासून जगभरात राहणारे काश्मिरी पंडित गुरु साहेबांशी जोडले गेले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, श्री गुरु तेगबहादुर जी यांनी हिंदूंवर आणि संपूर्ण भारतावर केलेले उपकार कोणीही विसरू शकत नाही. त्यांनी सांगितले की औरंगजेबाच्या कारकिर्दीत 1675 मध्ये असे एक बलिदान झाले, ज्याने संपूर्ण देशाच्या जनतेचे धैर्य वाढवलेच, तसेच औरंगजेबाच्या अत्याचार करण्याच्या शक्तीलाही खिळ बसवली. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यात अत्यंत घट्ट नाते आहे आणि याच भूमीला दशम पितांनी देहत्यागासाठी निवडले, असे त्यांनी सांगितले. सिख गुरूंच्या वाणीत संत नामदेवजी यांच्या भक्ती परंपरेचा समावेश आजही गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अमित शाह म्हणाले की, गुरु तेगबहादुर जी यांनी देशभरातील हिंदू आणि सिखांच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले आणि गुरु गोविंद सिंह जी महाराज यांनी खालसा पंथाची स्थापना केली. त्यांनी एका हातात माळ आणि दुसऱ्या हातात भाला घेऊन औरंगजेबाच्या अत्याचारांविरुद्ध सिखांना संघटित करून एका मोठ्या लढ्याची सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, नानकदेवजी महाराजांपासून गुरु गोविंद सिंहजी पर्यंत सर्व गुरूंनी मुघलांच्या अनेक पिढ्यांविरुद्ध धर्माचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारे समाजाला बळ देण्याचे कार्य केले. गुरु नानकदेवजी महाराज यांनी ज्ञानाचा प्रसार केला आणि अनेक कुप्रथांचा अंत केला. गुरु अंगददेवजी यांनी शिक्षणाचा प्रसार केला, गुरु अमरदासजी यांनी सामाजिक समरसतेचा प्रसार केला, गुरु रामदासजी यांनी अनेक संस्थांची स्थापना करून भक्कम पाया घातला, गुरु अर्जन देवजी यांनी सांस्कृतिक समावेशकतेसाठी कार्य केले, गुरु हरगोविंदजी साहिब यांनी भक्ती आणि धर्मरक्षणाचा आदर्श दिला. गुरु हररायजी यांनी दयेचा संदेश संपूर्ण जगात पसरवला, तेगबहादुरजी यांनी हिंद की चादरचे स्वरूप संपूर्ण जगासमोर ठेवले आणि गुरु गोविंद सिंहजी यांनी खालसा पंथाची स्थापना करून गुरु ग्रंथ साहिबचा प्रकाश पसरवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande