अंजनगाव सुर्जी परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका चोरीचा प्रयत्न: शिक्षण विभागाच्या भरारी पथकाची कारवाई, केंद्रप्रमुखांसह तिघांवर गुन्हा
अमरावती, 01 मार्च (हिं.स.) दहावीच्या परीक्षेदरम्यान अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई विद्यालयाच्या (केंद्र क्रमांक DC-28) परीक्षा केंद्रावर अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा केंद्राच्या आवारात उत्तरपत्रिकांची चोरी करण्याचा प्रयत्न झ
अंजनगाव सुर्जी परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका चोरीचा प्रयत्न: शिक्षण विभागाच्या भरारी पथकाची कारवाई, केंद्रप्रमुखांसह तिघांवर गुन्हा


अमरावती, 01 मार्च (हिं.स.)

दहावीच्या परीक्षेदरम्यान अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई विद्यालयाच्या (केंद्र क्रमांक DC-28) परीक्षा केंद्रावर अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा केंद्राच्या आवारात उत्तरपत्रिकांची चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने तातडीने कारवाई करत संबंधित परीक्षकांसह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे परीक्षा केंद्रांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमकी घटना काय घडली?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती विभागाच्या आदेशानुसार, जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणधिकारी रजनी नारायण शिरभाते आणि त्यांचे सहकारी भरारी पथक २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:४० वाजण्याच्या सुमारास सीताबाई संगई विद्यालय केंद्रावर तपासणीसाठी पोहोचले. यावेळी परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू होता.तपासणी दरम्यान पथकाला केंद्र व्यवस्थापनात मोठा गोंधळ दिसून आला. पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका सील करण्याची प्रक्रिया वेळेत होणे बंधनकारक असताना, सायंकाळी उशिरापर्यंत उत्तरपत्रिका सील करण्यात आल्या नव्हत्या.उत्तरपत्रिका चोरीचा थरारपथकाने अधिक बारकाईने पाहणी केली असता, अनिल हाडोले नावाचा कर्मचारी (जो तिथे हमाल म्हणून कार्यरत होता) संशयास्पद हालचाली करताना आढळला. पथकाने त्याला थांबवून तपासले असता, त्याच्या शर्टच्या आत लपवून ठेवलेल्या दोन उत्तरपत्रिका सापडल्या. त्यापैकी एक उत्तरपत्रिका इंग्रजी माध्यमाची आणि दुसरी उर्दू माध्यमाची होती. याबद्दल विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकारावेळी परीक्षक सुधीर दा. खोडे आणि सह-परीक्षक सुशील कुमार अभ्यंकर हे घटनास्थळी उपस्थित होते, तरीही त्यांनी कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही.पाच जणांवर गुन्हा दाखलशिक्षण अधिकारी रजनी शिरभाते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंजनगाव सुर्जी पोलिसांनी खालील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:१. सुधीर दा. खोडे (परीक्षक)२. सुशील कुमार अभ्यंकर (सह-परीक्षक)३. अनिल हाडोले (हमाल)४. दोन अनोखी विद्यार्थी (ज्यांना उत्तरपत्रिका पुरवल्या गेल्या असा संशय आहे)या सर्वांवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि 'महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम १९८२' अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.शिक्षण मंडळाची भूमिकापरीक्षा मंडळाच्या नियमावलीनुसार, प्रश्नपत्रिका पोलीस स्टेशनमधून आणण्यापासून ते उत्तरपत्रिका पोस्टापर्यंत पोहोचवण्यापर्यंतची सर्व जबाबदारी परीक्षकांची असते. मात्र, या केंद्रावर सर्व नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका परस्पर बदलण्याचा किंवा त्यात फेरफार करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत असून, परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका सोपवणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.परीक्षा केंद्रावर होणाऱ्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणे आणि हलगर्जीपणा करणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी आम्ही पोलिसांकडे सविस्तर अहवाल सादर केला आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande