ऊर्जा दक्षता ब्यूरो (बीईई) च्या २५ व्या स्थापना दिनानिमित्त आरसीओ पोर्टलचे उद्घाटन
नवी दिल्ली, 01 मार्च (हिं.स.)। ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य संस्था ऊर्जा दक्षता ब्यूरो (बीईई) ने नवी दिल्लीतील इंडिया हैबिटेट सेंटर येथे रविवारी आपला २५ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमादरम्यान बीईई-२५ लोगोचे
BEE Foundation Day Portal


नवी दिल्ली, 01 मार्च (हिं.स.)। ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य संस्था ऊर्जा दक्षता ब्यूरो (बीईई) ने नवी दिल्लीतील इंडिया हैबिटेट सेंटर येथे रविवारी आपला २५ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमादरम्यान बीईई-२५ लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच बीईई स्टार लेबल मोबाईल अॅप आणि आरसीओ पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला.

केंद्रीय विद्युत तसेच गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी “उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला” या उक्तीचा उल्लेख करत सांगितले की, बीईई ही वीज क्षेत्रासाठी प्रतिबंधात्मक संस्था म्हणून कार्य करते. आज वाचवलेली प्रत्येक वीज युनिट अतिरिक्त उत्पादन क्षमतेची गरज कमी करण्यास आणि उत्सर्जन घटविण्यास थेट हातभार लावते. ऊर्जा-कार्यक्षम पद्धतींचा अवलंब केल्याने आपण केवळ पर्यावरणाचे संरक्षण करत नाही, तर भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि अधिक शाश्वत भविष्यही सुनिश्चित करतो. त्यांनी देशात ऊर्जा कार्यक्षमतेच्या उपक्रमांना गती देण्यात बीईईच्या महत्त्वपूर्ण योगदानाचेही कौतुक केले.

मंत्र्यांनी सांगितले की, भारताने २००५ च्या पातळीच्या तुलनेत आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) उत्सर्जन तीव्रतेत ३६ टक्के घट केली आहे. तसेच २०३० च्या उद्दिष्टापूर्वीच ५२ टक्के गैर-जीवाश्म इंधनाधारित स्थापित वीज क्षमतेचे लक्ष्य गाठले आहे.

त्यांनी नवीकरणीय ऊर्जा खपत दायित्व (आरसीओ), परफॉर्म-अचीव्ह-अँड-ट्रेड (पीएटी) योजना, कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजना (सीसीटीएस) मध्ये संक्रमण, कॉर्पोरेट सरासरी इंधन कार्यक्षमता (सीएएफई), एमएसएमईसाठी एडीईटीआय योजना, मानक व लेबलिंग (एस अँड एल) कार्यक्रम, ऊर्जा संरक्षण व शाश्वत इमारत संहिता (ईसीएसबीसी) आणि परिवहन क्षेत्रातील कार्यक्षमतेच्या उपाययोजनांसह बीईईच्या प्रमुख उपक्रमांअंतर्गत साध्य झालेल्या महत्त्वपूर्ण यशांचा आढावा सादर केला.

केंद्रीय विद्युत सचिव पंकज अग्रवाल यांनी भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील बदलत्या स्वरूपाचे चित्रण केले. वाढती ऊर्जा मागणी, गैर-जीवाश्म इंधन क्षमतेचा विस्तार आणि वेगाने होणारे डिजिटलीकरण यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. त्यांनी ऊर्जा कार्यक्षमतेला भारताचे “प्रथम इंधन” असे संबोधत ऊर्जा सुरक्षा, परवडणारी किंमत आणि शाश्वतता यांच्यात संतुलन राखण्यासाठी ते महत्त्वाचे साधन असल्याचे सांगितले.

२५ व्या स्थापना दिन सोहळ्याने शाश्वत विकास, राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरणीय जबाबदारी यांना चालना देणाऱ्या ऊर्जा कार्यक्षमतेच्या प्रसारासाठी बीईईच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेची पुनर्प्रतिज्ञा केली. तसेच विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धारही अधोरेखित करण्यात आला. या प्रसंगी विविध केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, राज्य नामनिर्दिष्ट संस्था (एसडीए) आणि सहकारी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande