होळी व रमजान ईद एकोप्याने साजरी करा – पोलीस प्रशासनाचे आवाहन
रायगड, 01 मार्च (हिं.स.)। आगामी होळी आणि रमजान ईद सणांच्या पार्श्वभूमीवर म्हसळा पोलीस ठाणे यांच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. सणांच्या काळात तालुक्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
Celebrate Holi and Ramadan Eid in unity – appeal from the police administration


रायगड, 01 मार्च (हिं.स.)। आगामी होळी आणि रमजान ईद सणांच्या पार्श्वभूमीवर म्हसळा पोलीस ठाणे यांच्या वतीने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. सणांच्या काळात तालुक्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

बैठकीस तालुका हिंदू समाज अध्यक्ष समीर बनकर, मुस्लिम समाज उपाध्यक्ष मुब्बशिर जमादार, शहर ग्रामस्थ मंडळाचे सचिव सुशिल यादव, सेक्रेटरी साजिद हुर्जुक, माजी हिंदू समाज अध्यक्ष महादेव पाटील, जि.प. सदस्य अनिल बसवत, शिवसेना तालुका प्रमुख अमित महामुणकर, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, प्रसाद बोर्ले, कौस्तुभ करडे, दिपल शिर्के, प्रेस क्लब अध्यक्ष बाबू शिर्के, प्रसन्न निजामपुरकर यांच्यासह व्यापारी, राजकीय पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुस्लिम समाज उपाध्यक्ष मुब्बशिर जमादार यांनी सांगितले की, देशात व राज्यात काही ठिकाणी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडल्या असल्या तरी म्हसळा हा शांतताप्रिय तालुका आहे. हिंदू समाज अध्यक्ष समीर बनकर व माजी अध्यक्ष महादेव पाटील यांनी गोहत्या विषयावर भाष्य करत अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे, असे मत व्यक्त केले.

सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सर्व समाजातील नागरिकांनी एकमेका प्रती आदर राखून सण साजरे करावेत. सणांच्या काळात पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल. गोहत्या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही व कठोर कारवाई करण्यात येईल. कायद्यापुढे सर्व समान आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करत कोणतीही लिंक किंवा अॅप डाउनलोड करण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहण्याचा सल्ला दिला. बैठकीचा समारोप सर्वांना होळी व पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande