सोलापूर-सहकारी साखर कारखाने आता बीओटीवर
सोलापूर, 01 मार्च (हिं.स.)। साखर उद्योगातील अस्थिरता, प्रतिकूल हवामान, संचालक मंडळाच्या बेजाबदारपणांमुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना घरघर लागली आहे. आर्थिक अडचणीतील सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी राज्य शासनाने नवे धोरण जाहीर
sugar mill


सोलापूर, 01 मार्च (हिं.स.)। साखर उद्योगातील अस्थिरता, प्रतिकूल हवामान, संचालक मंडळाच्या बेजाबदारपणांमुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना घरघर लागली आहे. आर्थिक अडचणीतील सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी राज्य शासनाने नवे धोरण जाहीर केले आहे. आर्थिक अडचणीतील सहकारी कारखाने खासगी भांडवलदारांच्या ताब्यात देऊन बीओटी तत्त्वावर सुरू केले जाणार आहेत. वाढती स्पर्धा, उत्पादन खर्च यामुळे साखर कारखाने केवळ साखर उत्पादनावर अलंबून राहून ते चालविणे अशक्य झाले आहे. यापूर्वी शासनाने थकहमीची कर्ज देऊनही सहकारी कारखाने आर्थिक अडचणीत बाहेर येऊ शकले नाहीत. त्यामुळे साखर कारखान्यांना आता अधिक उत्पन्नासाठी बगॅस, मळी, प्रेसमड या उप उत्पादनांबरोबरच सहवीज निर्मिती, आसवनी, इथेनॉल, बायोगॅस, देशी आणि विदेशी दारू, मिनरल वॉटर, सॅनिटायझर, ऑक्सिजन प्रकल्प, कॉर्बन डायऑक्साइड प्रकल्प, पार्टीकल बोर्ड, पेपर उत्पादन प्रकल्प, बायोप्लास्टीक, स्पेंट वॉश, सॉईल कंडिशनर, ऑरगॅनिक केमिकल, जैविक प्रेरके, संप्रेरके, सौरउर्जा आदी प्रकल्प राबवत आहेत. तरीही त्यांच्यापुढील आर्थिक समस्या संपण्याची नाव घेत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande