
कर्ण कदूर- मुसा शेरीफ जोडीला अपेक्षेप्रमाणे उपविजेतेपद,रंगतदार रॅलीचा समारोप
नाशिक, 01 मार्च (हिं.स.)। - ब्लू बॅंड आयएनआरसी रॅली ऑफ महाराष्ट्रच्या सहाव्या फेरीत अपेक्षेप्रमाणे विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मंगळूरचा डीन मस्कारेन्हास-करूबाह गगन(टीएसआय रेसिंग) यांनी वर्चस्व राखत सर्वीत्कृष्ठ विजेतेपदाचा(ओव्हरऑल गटात चॅम्पियन) बहुमान पटकावला. अरेका मोटारस्पोर्टस् च्या कर्णकदूर-मुसा शेरीफ जोडी उपविजेतपदावर आपले नाव कोरले.
आयएनआरसीच्या इतर गटात - फिलोपियस मथाई-हरीश के एन.(स्नॅप रेसिंग), विशाखा बी, चेरथ जैन (चेटीनाड स्पोर्टींग), जीत जाभक, व्ही.शेखर(जेए मोर्टारस्पोर्टस्), अभिन राय-जयशैर मोईदीन (अभिन टिम), थारूषी विक्रम-मुकूंद राय वैभव(चेटीनाड स्पोर्टींग), पी सतिश-केआर.ऋषिकेश (आर-टेक मोटारस्पोर्टस्) संजय अग्रवाल- धिरज माने (अग्रवाल संजय टिम) या जोड्यांनी आपआपल्या गटात वर्चस्व राखत विजेतेपद पटकावले.`विसा`च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने मिळालेला मान हा उत्कृष्ठ आयोजनांमुळे अखेरच्या फेरीतही सर्वांच्या लक्षात रहावा असाच झाला.
चालकांची सावध भूमिका अन् सहजपणे पार केले अंतरकालच्या अपघातानंतर आज वळणावळणाचे डांबरी रस्ते, अचानक समोर येणारे उंचवटे हे कारचालकांनी अचूक नियोजन करत तसेच आपला कारवर पूर्णपणे ताबा, नियंत्रण ठेवत सहजपणे पार केले, सर्वच कारचालकांनी सावध भूमिका घेतल्याचा दिसते. त्यामुळे कुठेही चुरशीचा खेळ आज पहायला,अनुभवायला मिळाला नाही. पोशेरा ते हिरवेगाव,करोली ते ओसीरवारा आणि कळंब ते खारवळ हे सर्व अंतर अतिशय सुत्रबध्दपध्दतीने पार करत सर्व कालचालक सपकाळ नॉलेज हब येथील सर्व्हिसपार्कवर सकाळी साडेदहापर्यत सुखरूप येऊन पोहचले.
पारितोषिक वितरणानंतरचा कारचालकांचा जल्लोषसकाळ सत्रानंतर नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जलज शर्मा,ब्लु बॅंडचे श्री.फेडरिक,नितीन मुनोत,संजय अब्राहम,श्री. के मधुसुदन यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा झाला. या मान्यवरांनी विविध गटांतील विजेते,उपविजेत्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह देऊन गौरविले. श्री.शर्मा व ब्लू बॅंडचे प्रेम काशिनाथ यांनी विसाच्या रौप्य महोत्सव व उत्कृष्ठ आयोजनांबद्दल शुभेच्छा देण्याबरोबरच कौतुक करत इतर संस्थांनी त्यांचा आदर्श ठेवून आपले काम करावे असे सांगितले. पारितोषिकानंतर सर्व विजेत्यांनी एकच जल्लोष केला, टाळ्या,शिट्या वाजवत तसेच विजेते त्यांच्या कार तसेच समुहांबरोबर फोटो काढण्यात उपस्थितांचा चांगला उत्साह दिसून आला. या रॅलीसाठी विसाच्या मुख्य आयोजनांच्या जोडीला एमआरएफसह सपकाळ नॉलेज हब, ग्रेप कौटीं,मायएफएम पीएबीएस,श्री.रामकृष्ण हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले.
रॅलीचा निकाल असाः गट,प्रथम,द्वितीय,तृतीय तसेच क्लबचे नाव या क्रमाने-ओव्हरॉल चॅम्पियन- डीन मस्कारेहास-करूबाह गगन (टीएसआय रेसिंग) कर्णकदूर-मुसा शेरीफ (अरेका मोटारस्पोर्टस्),फिलोपियस मथाई-हरीश के एन.(स्नॅप रेसिंग)-आयएनआरसी चॅम्पियन- डीन मस्कारेहास-करूबाह गगन (टीएसआय रेसिंग) कर्णकदूर-मुसा शेरीफ (अरेका मोटारस्पोर्टस्)-आयएनआरसी टू- फिलोपियस मथाई-हरीश के एन.(स्नॅप रेसिंग),दारूज श्राँफ-धिरेंद्र अरूण(चेंटीनाड स्पोर्टींग),प्रगती गौडा-मादि राजू(चेटींनाड स्पोर्टींग)-आयएनआरसी-थ्री-विशाखा बी, चेरथ जैन (चेटीनाड स्पोर्टींग),अभिनराही-माईक्युन जसमेर,थारूषी विक्रम-मुकूंद राय वैभव(चेटीनाड स्पोर्टींग)-आयएनआरसी-थ्रीटी- जीत जाभक, व्ही.शेखर(जेए मोर्टारस्पोर्टस्), फुलीगिलीया नवीन, संतोष थॉमस आर( चेटीनाड स्पोर्टींग), जे.तेजस्, एसएसबी अर्जुन( स्नॅप रेसिंग)-जेआयएनआरसी- अभिन राय-जयशैर मोईदीन (अभिन टिम), ,थारूषी विक्रम-मुकूंद राय वैभव(चेटीनाड स्पोर्टींग),संजीवन अभिमन्यु-सीए अविनाश(स्नॅप रेसिंग)-महिला गट- थारूषी विक्रम-मुकूंद राय वैभव(चेटीनाड स्पोर्टींग),डेल नानगुरम फोबे-उपेंद्र थिमाना(चेटीनाड स्पोर्टींग)-क्लासिक गट- पी सतिश-केआर.ऋषिकेश (आर-टेक मोटारस्पोर्टस्)-जिप्सी गट— संजय अग्रवाल- धिरज माने (अग्रवाल संजय टिम)
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV