सोलापूर-ह.भ.प. अनिल महाराज तळपे यांचे संगीत प्रवचन
सोलापूर, 01 मार्च (हिं.स.)अकोले तालुक्यातील इंदोरी येथील आदर्श शिक्षक कै. आबाजी चिमाजी धुमाळ (सर) यांचे पाचवे पुण्यस्मरण कार्यक्रम मंगळवार, दि. ३ मार्च रोजी होणार आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यासाठी आणि त्यांनी दिल
सोलापूर-ह.भ.प. अनिल महाराज तळपे यांचे संगीत प्रवचन


सोलापूर, 01 मार्च (हिं.स.)अकोले तालुक्यातील इंदोरी येथील आदर्श शिक्षक कै. आबाजी चिमाजी धुमाळ (सर) यांचे पाचवे पुण्यस्मरण कार्यक्रम मंगळवार, दि. ३ मार्च रोजी होणार आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यासाठी आणि त्यांनी दिलेली मूल्यांची शिदोरी पुढे नेण्यासाठी त्यांचे पुत्र सुनील आबाजी धुमाळ आणि अनिल आबाजी धुमाळ यांनी पुढाकार घेऊन या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.

यानिमित्ताने इंदोरी फाटा येथील पद्मावती नगरमधील 'मातोश्री लॉन्स' येथे सायंकाळी ६:३० वाजता भव्य संगीत प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न होईल. सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अनिल महाराज तळपे आपल्या रसाळ वाणीतून संगीत प्रवचन सेवा सादर करणार आहेत.

आपल्या वडिलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन्ही मुलांनी आणि समस्त धुमाळ परिवाराने या भक्तीमय सोहळ्याचे आयोजन केले असून, यानिमित्ताने समाजातील विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांनी व स्नेह्यांनी कोणत्याही प्रकारचे टोपी, टॉवेल किंवा शाल आणू नये, अशी आग्रहाची विनंती धुमाळ परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त धुमाळ परिवार, नातेवाईक व इंदोरी ग्रामस्थांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande