
नांदेड, 01 मार्च (हिं.स.)।
निसर्गाच्या आविष्कारातील सप्तरंग रंगांची उधळण करणारा होळी, धुळवड सण येऊन ठेपला असून बाजारात तयारीची लगबग दिसून येत आहे. पण यंदा तालुक्यात काही भागात पाणीटंचाईचे बसत असलेला झळा, वाढती महागाईचे सावट आणि धुळवड दिवशी चंद्रग्रहण होणार असून त्याचे वेध सकाळपासून सुरू होणार आहे त्यामुळे भोजनाचे बेत आयोजित करणाऱ्या मंडळीचा ग्रहणामुळे हिरमोड झाला आहे. तसेच आगामी जि. प., पं. स. निवडणुका व ग्रामपंचायत निवडणुकाचे पडघमही यावर दिसू लागले आहेत.
फाल्गुन कृष्ण पंचमी तिथीला शिशिर ऋतूत रंगपंचमी हा सण सर्वत्र साजरा केला जातो. तशी प्रथा आहे. पण यंदा तालुक्यात वाडी, तांडे व गावात काही भागात पाणीटंचाई तसेच महागाईच्या झळांमुळे होळीवर त्याचे
सावट पसरले आहे. पूर्वी फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पदार्थपासून रंग केले जात असत. या रंगामुळे पंचमीचा आनंद द्विगुणित होई आता बाजारात घातक रासायनिक पदार्थ कलर मिश्रित केले जाते त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis