भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांसाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
— व्हिसा मुदतवाढीसाठी एफआरआरओशी संपर्क साधण्याचे आवाहन नवी दिल्ली, 01 मार्च (हिं.स.)। मध्यपूर्व आशियामध्ये अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर तसेच इराणकडून झालेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थिती
INDIA ADVISORY FOREIGN NATIONA


— व्हिसा मुदतवाढीसाठी एफआरआरओशी संपर्क साधण्याचे आवाहन

नवी दिल्ली, 01 मार्च (हिं.स.)। मध्यपूर्व आशियामध्ये अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर तसेच इराणकडून झालेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशात अडकलेल्या परदेशी नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे की, या घटनाक्रमामुळे ज्यांच्या भारतातून प्रस्थानाच्या योजना विस्कळीत झाल्या आहेत आणि ज्यांना आपला प्रवास पुढे ढकलावा लागला आहे, अशा परदेशी नागरिकांनी आपल्या व्हिसाची मुदतवाढ किंवा भारतातील वास्तव्य नियमित करण्यासाठी तात्काळ जवळच्या विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाशी (एफआरआरओ) संपर्क साधावा.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की संबंधित विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालय प्रभावित नागरिकांना आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी संपूर्ण मदत करेल, जेणेकरून त्यांचे भारतातील वास्तव्य कायदेशीर आणि वैध राहील.

उल्लेखनीय आहे की, प्रादेशिक तणाव वाढल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. काही भागांमध्ये हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्याने भारतात थांबलेल्या परदेशी नागरिकांच्या परतीच्या प्रवासावर परिणाम झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande