
छत्रपती संभाजीनगर, 01 मार्च (हिं.स.)।
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघच्या (इस्कॉन) अदालत रोडस्थित मधुबन केंद्राच्या वतीने मंगळवार, ३ मार्च रोजी चैतन्य महाप्रभूचा जन्मोत्सव गौरपौर्णिमा उत्सव साजरा केला जाईल अशी माहिती जीवदया प्रभू यांनी दिली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह फुलांची होळी खेळली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
जीवदया प्रभू यांनी सांगितले, की समस्त विश्वाला हरिनाम संकीर्तनाच्या धारेत चिंब भिजवणारे युग अवतार चैतन्य महाप्रभू यांचा पावन जन्मोत्सव आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघद्वारे प्रतिवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत हर्षोल्हासात साजरा केला जातो.
याच क्रमाने इस्कॉन मधुबन केंद्रात सायंकाळी सहा वाजेपासून
कीर्तन आणि महाप्रभूचा अभिषेक होईल.
त्यानंतर नाशिक येथील कृष्ण धन प्रभू हे चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनावर आणि त्यांच्या शिकवणुकीवर प्रवचन देतील. महाआरती आणि छप्पन भोगनंतर महाप्रसादाचे वितरण होईल. शेवटी सर्व भक्त मिळून फुलांची होळी खेळतील. महाप्रभूच्या जन्मोत्सवासाठी भव्य तयारी केली जात आहे.
केंद्र परिसरात भक्तांच्या वतीने आध्यात्मिक शिक्षणाशी संबंधित अनेक स्टॉल्स लावले जातील
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis