नांदेड जिल्ह्यातील पाच गावांच्या तलाठी सज्जांचे उद्घाटन
नांदेड, 01 मार्च (हिं.स.)। लोहा तालुक्यातील सावरगाव (नसरत), देऊळगाव (माळ्याचे), धानोरा (मक्ता), रिसनगाव आणि दापशेड या पाच गावांच्या तलाठी सज्जाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते तहसील कार्यालयात करण्यात आ
नांदेड जिल्ह्यातील पाच गावांच्या तलाठी सज्जांचे उद्घाटन


नांदेड, 01 मार्च (हिं.स.)। लोहा तालुक्यातील सावरगाव (नसरत), देऊळगाव (माळ्याचे), धानोरा (मक्ता), रिसनगाव आणि दापशेड या पाच गावांच्या तलाठी सज्जाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते तहसील कार्यालयात करण्यात आले. या सोयीमुळे ग्रामस्थांना कार्यालयात येण्यास वेळ आणि खर्च वाचेल, तसेच कामांची वेळेवर पूर्तता होईल, असे आमदार चिखलीकर यावेळी म्हणाले.

उद्घाटन सोहळ्यात तहसीलदार विठ्ठल परळीकर, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य हंसराज पाटील बोरगावकर, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, गटनेते भास्कर पाटील पवार, सरपंच व माजी सरपंचांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. नव्याने तयार झालेल्या सज्ज कार्यालयावर उपस्थित राहून ग्रामस्थांची कामे वेळेत पूर्ण करावीत, तसेच उर्वरित तलाठी सज्जांच्या इमारतींच्या बांधकामावर देखील लक्ष ठेवावे, असे आमदार चिखलीकर यांनी तलाठींना निर्देश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande