कर्मवीर भाऊसाहेब हिरे राष्ट्रीय वाद-विवाद स्पर्धा एक मोठे व्यासपीठ - कुलगुरू डॉ. गोसावी
नाशिक, 01 मार्च, (हिं.स.)। महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक यांच्या वतीने आयोजित ५३ व्या ‘कर्मवीर भाऊसाहेब हिरे राष्ट्रीय आंतर-महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धे’चा उ
कर्मवीर भाऊसाहेब हिरे राष्ट्रीय वाद-विवाद स्पर्धा एक मोठे व्यासपीठ - कुलगुरू डॉ. गोसावी


नाशिक, 01 मार्च, (हिं.स.)। महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक यांच्या वतीने आयोजित ५३ व्या ‘कर्मवीर भाऊसाहेब हिरे राष्ट्रीय आंतर-महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धे’चा उद्घाटन समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या समारंभाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, “वाद-विवाद स्पर्धा लोकशाही मूल्यांच्या बळकटीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. संस्थेने ५३ वर्षांपासून ‘कर्मवीर भाऊसाहेब हिरे राष्ट्रीय आंतर-महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांची जडण-घडण केली आहे. त्यामुळे संस्थेचे कौतुक आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.”

तसेच ते पुढे म्हणाले की, ‘मेड इन इंडिया’-‘मेक इन इंडिया’ असे तंत्रज्ञानात्मक जे काही बदल होत आहेत ते भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी पूरक आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमांवर विषय टाकून कविता तयार केली म्हणजे कोणी कवी होत नाही, त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रतिभेला चालना देत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले पाहिजे. जागतिकीकरणाच्या युगात बदलत्या आर्थिक धोरणांचे महत्त्व स्पष्ट करून अमेरिकेच्या टेरीफ धोरणाचा भारताच्या उद्योग, उत्पादन व निर्यात क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांवर थोडक्यात भाष्य करत विद्यार्थ्यांनी अशा विषयांवर सखोल अभ्यास करून चिकित्सक दृष्टीकोन विकसित करावा. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रशांत हिरे , अपूर्व हिरे ,संपदा हिरे, हरीश आडके व इतर मान्यवर उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande