लातूरच्या पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचा न्यायमूर्तींच्या हस्ते गौरव
लातूर, 01 मार्च (हिं.स.)। गुन्हेगारांचा थरकाप उडवणाऱ्या ‘सिंघम’यांचा सन्मान – लातूरच्या पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचा न्यायमूर्तींच्या हस्ते गौरव लातूरात गुन्हेगारी विरोधात आक्रमक कारवाई करत गुन्हेगारांच्या काळजात धडकी भरवणारे, मोठमोठे गुन्ह
सुधाकर बावकर


लातूर, 01 मार्च (हिं.स.)।

गुन्हेगारांचा थरकाप उडवणाऱ्या ‘सिंघम’यांचा सन्मान – लातूरच्या पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचा न्यायमूर्तींच्या हस्ते गौरव

लातूरात गुन्हेगारी विरोधात आक्रमक कारवाई करत गुन्हेगारांच्या काळजात धडकी भरवणारे, मोठमोठे गुन्हे उकलून कायद्याचा धाक निर्माण करणारे लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचा त्यांच्या उल्लेखनीय व धडाडीच्या कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

महा विधी सेवा शिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या उद्घाटन समारंभात हा गौरव सोहळा पार पडला. या वेळी मा. न्यायमूर्ती एस. जी. चपळगांवकर व मा. न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव यांच्या हस्ते सुधाकर बावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना आणि मनपा आयुक्त मानसी मीना यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

लातूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालत अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करून कायद्याची पकड अधिक भक्कम करणाऱ्या बावकर यांनी आपल्या धडाडीच्या कारवाईने गुन्हेगारांना अक्षरशः घाम फोडला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे स्थानिक गुन्हे शाखेची प्रतिमा उंचावली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ झाली आहे.

कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि कठोर कायदा अंमलबजावणीच्या जोरावर ‘सिंघम’ अशी ओळख निर्माण केलेल्या सुधाकर बावकर यांच्या कार्याचा गौरव हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, संपूर्ण पोलीस दलाच्या कर्तव्यभावनेचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande