पुण्यातून दुबईसाठी विमान सेवा २ दिवस राहणार बंद
पुणे, 01 मार्च (हिं.स.)। अमेरिका, इस्राएल आणि इराण मध्ये सुरू असलेल्या युद्धाची धग आता संयुक्त अरब अमिरातीतील दुबई पर्यंत पोहचली आहे. इराणने दुबईसह काही देशांत ड्रोन हल्ले केले आहेत. यामुळे आखाती देशातील बहुतांश सर्वच विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे
Pune Air port


पुणे, 01 मार्च (हिं.स.)। अमेरिका, इस्राएल आणि इराण मध्ये सुरू असलेल्या युद्धाची धग आता संयुक्त अरब अमिरातीतील दुबई पर्यंत पोहचली आहे. इराणने दुबईसह काही देशांत ड्रोन हल्ले केले आहेत. यामुळे आखाती देशातील बहुतांश सर्वच विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. पुण्यातून आज आणि उद्या दुबईला जाणारे विमाने सुद्धा रद्द करण्यात आली आहेत. पुण्याहून दुबईला दररोज दोन विमाने उड्डाण करतात मात्र तेथील एअरस्पेस बंद असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विमान कंपन्यांनी याबाबतची माहिती प्रवाशांना दिली असून प्रवाशांनी सुद्धा वेळापत्रक तपासून प्रवास नियोजित करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज (ISBS), इंदिरा युनिव्हर्सिटीचे ८४ एमबीए विद्यार्थी आणि ४ शिक्षक दुबईत अडकले आहेत. हे विद्यार्थी शैक्षणिक अभ्यास दौरा (स्टडी टूर) साठी २२ आणि २३ फेब्रुवारीला पुण्यातून दुबईला गेले होते. त्यांचा परतीचा प्रवास २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला नियोजित होता, मात्र संघर्षामुळे हवाई क्षेत्र बंद झाल्याने फ्लाइट्स रद्द झाल्या आणि ते तेथे अडकले.इराणने प्रत्युत्तरादाखल इस्रायल आणि आखाती देशांवर (यूएईसह) मिसाइल हल्ले केले. यामुळे दुबई, अबु धाबी, दोहा येथील हवाई क्षेत्र बंद झाले. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर किरकोळ नुकसान झाले असून, काही ठिकाणी स्फोटांचे ध्वनी ऐकू आले. यामुळे हजारो फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत. ---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande