नागपूर कारखाना स्फोट : पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली, १ मार्च (हिं.स.) नागपूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला.आणि मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर लिहीले की, महाराष्ट्रातील
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, १ मार्च (हिं.स.) नागपूर येथील कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला.आणि मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर लिहीले की, महाराष्ट्रातील नागपूर येथील कारखान्यात झालेला स्फोट अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांना माझ्या तीव्र संवेदना आहेत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे.

पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) कडून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत दिली जाईल. घटनेत जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला अतिरिक्त ५०,००० मदत दिली जाणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुळगांव स्थित एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात 15 जण ठार झावेक. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनेला दुजोरा दिला असून जखमींचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे आज सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात आतापर्यंत या भीषण स्फोटत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande