पुणे : मंगळवारी मार्केट यार्डातील भाजीपाला आणि फळ बाजार बंद
पुणे, 01 मार्च (हिं.स.)।मंगळवारी धुलिवंदन आहे. त्यामुळे या दिवशी दरवर्षीप्रमाणे पुणे बाजार समितीचा मुख्य बाजार असलेल्या मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, फुल, पान, केळी आणि मोशी उपबाजार बंद राहणार आहे.याबाबतचे पत्रक सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्या
पुणे : मंगळवारी मार्केट यार्डातील भाजीपाला आणि फळ बाजार बंद


पुणे, 01 मार्च (हिं.स.)।मंगळवारी धुलिवंदन आहे. त्यामुळे या दिवशी दरवर्षीप्रमाणे पुणे बाजार समितीचा मुख्य बाजार असलेल्या मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, फुल, पान, केळी आणि मोशी उपबाजार बंद राहणार आहे.याबाबतचे पत्रक सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्या सहीने काढण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, तसेच, व्यापाऱ्यांनी खरेदीस आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्य वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande