पुणे ग्रँड टूरकडून सायकलिंग समुदायासाठी अधिकृत नोंदणीचे आवाहन
पुणे, 01 मार्च (हिं.स.)। पुणे ग्रँड टूरच्या अभूतपूर्व यशानंतर, जिल्हा प्रशासन आणि स्पर्धा आयोजकांनी पुण्यातील सायकलिंग इकोसिस्टम अधिक मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आगामी आवृत्तीच्या पार्श्वभूमीवर, व्यावसायिक सायकलपटू, सायकलिंग क्लब, संस्था आण
पुणे ग्रँड टूरकडून सायकलिंग समुदायासाठी अधिकृत नोंदणीचे आवाहन


पुणे, 01 मार्च (हिं.स.)। पुणे ग्रँड टूरच्या अभूतपूर्व यशानंतर, जिल्हा प्रशासन आणि स्पर्धा आयोजकांनी पुण्यातील सायकलिंग इकोसिस्टम अधिक मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आगामी आवृत्तीच्या पार्श्वभूमीवर, व्यावसायिक सायकलपटू, सायकलिंग क्लब, संस्था आणि या क्षेत्राच्या वाढीस हातभार लावणाऱ्या सर्व घटकांसाठी पुणे ग्रँड टूरने अधिकृत नोंदणी उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमासाठी www.punegrandtour.in या अधिकृत संकेतस्थळावर मोफत नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुण्यातील सायकलिंग क्षेत्रासाठी एकात्मिक आणि भविष्याभिमुख जाळे निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. भारतातील सायकलिंग क्रांतीचे अग्रदूत म्हणून, सायकलिंग क्षेत्रातील सर्व घटकांना एका समान व्यासपीठावर आणणे, प्रतिभा संवर्धन, ज्ञानविनिमय आणि या क्रीडा प्रकाराची संरचित वाढ साध्य करणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे.

सायकलिंग क्षेत्राशी संबंधित सर्व पात्र व्यक्ती व संस्थांनी संकेतस्थळावरील लिंकद्वारे नोंदणी करून या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande