रेणापूर तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय इमारतीचे लोकार्पण
जोडधंदा केल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती शक्य नाही-आ.कराड लातूर, 01 मार्च (हिं.स.)। नव्याने उभारण्यात आलेल्या रेणापूर येथील अद्यावत सर्व सोयीनेयुक्त पशुवैद्यकीय चिकित्सालय इमारतीतून शेतकऱ्याच्या पशुधनाच्या अडीअडचणीची सोडून होईल अस
आमदार कराड


जोडधंदा केल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती शक्य नाही-आ.कराड

लातूर, 01 मार्च (हिं.स.)।

नव्याने उभारण्यात आलेल्या रेणापूर येथील अद्यावत सर्व सोयीनेयुक्त पशुवैद्यकीय चिकित्सालय इमारतीतून शेतकऱ्याच्या पशुधनाच्या अडीअडचणीची सोडून होईल असे सांगून शेतीला जोडधंदा केल्याशिवाय शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता येणार नाही, आर्थिक उन्नती होणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता बदलावी लागेल असे प्रतिपादन भाजपाचे नेते आ.रमेशआप्पा कराड यांनी केले.

पशुसंवर्धन विभागामार्फत रेणापूर येथे तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाची भव्य दोन मजली इमारत उभारण्यात आली असून या इमारतीचा लोकार्पण सोहळा लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी बोलताना आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, शेतकऱ्यांचे पशुधन वाढले पाहिजे त्यासाठी शासन प्रयत्न करीत असून सर्व सोयींनी युक्त असे पशु चिकित्सालयाच्या इमारतीची रेणापुरात उभारणी झाली असून या इमारतीतून पशुधनाच्या अडीअडचणी तातडीने दूर व्हाव्यात. पशुसंवर्धन आणि चिकित्सालय अनुषंगाने ज्या ज्या योजना राबवायच्या आहेत अशा योजनांचे प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांनी तयार करावेत या सर्व प्रस्तावांना पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडून मंजूर करून घेण्याची आणि त्यासाठी लागणाऱ्या निधी आणण्याची जबाबदारी माझी असेल असेही त्यांनी बोलून दाखविले.

शासनाच्या विविध योजनेचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा असे सांगून रेणापूर तालुक्यातील विविध विभागात आत्मियतेने आणि तळमळीने काम करणारे कर्तुत्वान कर्मचारी आहेत ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक अनिता अलगुले यांनी राज्यस्तरावरील पुरस्कार प्राप्त केला तर खरोळा येथील पशु वैद्यकीय दवाखान्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला याबद्दल संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करून आ. रमेशआप्पा कराड यांनी अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande