'स्मॅक' क्रिकेट टूर्नामेंटमध्ये रत्ना उद्योगचा संघ विजयी : झंवर ग्रुप उपविजेता
कोल्हापूर, 01 मार्च (हिं.स.)। शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅक तर्फे आयोजित '' स्मॅक प्रीमियर लीग - २०२६ '' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्ना स्ट्रायकर्स आणि झंवर ग्रुप चॅम्पियन्स यांच्यात अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात र
स्मॅक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा विजेते संघ


कोल्हापूर, 01 मार्च (हिं.स.)।

शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅक तर्फे आयोजित ' स्मॅक प्रीमियर लीग - २०२६ ' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्ना स्ट्रायकर्स आणि झंवर ग्रुप चॅम्पियन्स यांच्यात अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रत्ना स्ट्रायकर्स (रत्ना उद्योग) संघाने झंवर ग्रुप चॅम्पियन्स (झंवर ग्रुप) वर ५ गडी राखून विजय मिळविला. चुरशीच्या सामन्यात शेवटच्या एका चेंडूवर दोन धावांची गरज असताना नो बॉल मिळाला आणि रत्ना स्ट्रायकर्सने अजिंक्यपद पटकावले. महापौर रूपाराणी निकम, स्पर्धेचे प्रायोजक विजय सोमानी व योगिनी सोनी यांच्या हस्ते डीवायएसपी प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत विजयी संघाला चषक देण्यात आले. उपविजेत्या झंवर ग्रुप चॅम्पियन्सलाही यावेळी चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्मॅक चे अध्यक्ष जयदीप चौगले, उपाध्यक्ष भरत जाधव, ऑ. सेक्रेटरी रणजीत जाधव, खजानिस बदाम पाटील, सुवर्णमहोत्सव समिती अध्यक्ष सुरेन्द्र जैन प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूरच्या शास्त्रीनगर मैदानावर दिवस-रात्र (डे-नाईट) दोन दिवस सुरू असलेल्या ' स्मॅक प्रीमियर लीग २०२६ ' मध्ये आज दुसऱ्या दिवशी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अत्यंत चुरशीने झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा लागून राहिली होती.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झंवर ग्रुप चॅम्पियन्सने निर्धारित ८ षटकांत ७ बाद ७९ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रत्ना उद्योगच्या फलंदाजांनी संयम आणि आक्रमकतेचा सुरेख संगम साधला. ७.५ षटकांत ५ गडी गमावून ८३ धावा करत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.

शिरोली औद्योगिक क्षेत्रातील १२ नामांकित उद्योगांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शनिवारी रात्री उशिरा प्रकाश झोतात उपांत्य व अंतिम सामने खेळवण्यात आले. तत्पूर्वी उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत विजय मिळवत रत्ना स्ट्रायकर्स आणि झंवर ग्रुप चॅम्पियन्स या दोन बलाढ्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली.

पहिला उपांत्य सामना रत्ना स्ट्रायकर्स विरुद्ध ट्रायो चॅलेंजर्स यांच्यात झाला. या सामन्यात रत्ना स्ट्रायकर्सने ट्रायो चॅलेंजर्स वर ७ गडी राखून मात केली.

दुसरा उपांत्य सामना झंवर ग्रुप चॅम्पियन्स विरुद्ध यश टायगर्स यांच्यात झाला. हा सामना एकतर्फी ठरला. झंवर ग्रुप चॅम्पियन्स ने यश टायगर्स वर ११ भावानी दणदणीत विजय मिळवत झंवर ग्रुपने मोठ्या दिमाखात अंतिम फेरी प्रवेश केला.

उपांत्य पूर्व फेरीचा सामना ट्रायो चॅलेंजर्स विरुद्ध व्ही. पी. वॉरियर्स या दोन संघात झाला. या सामन्यात ट्रायो चॅलेंजर्सने व्ही. पी. वॉरियर्स संघावर ७ गडी राखून सहज विजय मिळवला.

तर दुसऱ्या सामन्यात यश टायगर्स विरुद्ध मिस्टेर मार्व्हेलसच्या सामन्यात यश टायगर्सने ९ गडी राखून मात करत विजय मिळवला.

तसेच रत्नास स्ट्राईकर्स विरुद्ध कॅस्प्रो इलेव्हन च्या सामन्यात कॅस्प्रो इलेव्हन ला ७ गड्या आणि पराभूत करत रत्नास स्ट्राईकर्स उपांत्य फेरीत प्रवेश केला.

तसेच झंवर ग्रुप चॅम्पियन्स विरुद्ध सरोज वॉरियर्सच्या सामन्यात झंवर ग्रुप चॅम्पियन्स ने सरोज वॉरियर असता ७ गड्यांनी पराभव करत आपली आगेकूच कायम राखली.

उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांमध्ये प्रेक्षकांना उत्कंठावर्धक खेळ पाहायला मिळाला.

यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, “औद्योगिक क्षेत्रातील कामाच्या व्यापातून वेळ काढून खेळाडू वृत्ती जोपासणे कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धांमुळे उद्योजक आणि कर्मचाऱ्यांमधील समन्वय वाढतो. स्पर्धेत जिंकणे-हरणे हा खेळाचा एक भाग असला, तरी प्रत्येक संघाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, हेच खरे कौतुकास्पद आहे. आव्हानाला सामोरे जाणे आणि मैदानात उतरून सर्वोत्तम देण्याची वृत्ती अधिक महत्त्वाची आहे”

स्मॅक प्रीमियर लीगमध्ये रत्ना उद्योग संघाचा दबदबा कायम राहिला. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी करत अवधूत पाटील याने ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ तसेच ‘बेस्ट बॅट्समन’किताब पटकावला. तर अचूक व प्रभावी गोलंदाजीसाठी वैभव तासगांवकर (रत्ना उद्योग) याला ‘बेस्ट बॉलर पुरस्काराने गौरविण्यात आले.

या सोहळ्याला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, स्मॅक चे संचालक निरज झंवर, निमंत्रित सदस्य एम. वाय. पाटील, ॲड. अशोक उपाध्ये अनेक उद्योजक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande