
नांदेड, 01 मार्च (हिं.स.)।
श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर (३७५) अमृत महोत्सव सदेह वैकुंठ गमन सांगता सोहळा व सामूहिक गाथा पारायणास सोनखेड येथे सुरुवात झाली आहे. देहू नंतर प्रति देहू व संताची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनखेड ता. लोहा येथील सप्ताहास प्रारंभझाला आहे.
या सप्ताहामध्ये पहाटे ४ ते ६ काकड आरती, ६ ते ७विष्णुसहस्त्रनाम, सकाळी ७ ते १२ श्री संत तुकोबारायांचे गाथा पारायण, दुपारी १ ते २ गाथा भजन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरी किर्तन होईल तसेच या सप्ताहामध्ये दोन वेळा अन्नदात्याकडून पंगत असणार आहे २ मार्च ह.भ.प पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी देवाची), ३ मार्च रोजी श्री.ह.भ.प गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी (आळंदी देवाची), ४ मार्च श्री. ह.भ.प गाथामूर्ती दत्तात्रय महाराज अंबीरकर, ५ मार्च रोजी सकाळी श्री संत तुकोबाराय व विठ्ठल रुक्मिणीचा महाअभिषेक, गाथा पारायणाची सांगता व गाथा पूजन होईल. नंतर १० ते १ श्री.ह.भ.प पद्मनाभ महाराज व्यास यांचे गुलालाचे कीर्तन आणि गुलाल उधळल्यानंतर बाजार मैदान सोनखेड येथेसार्वजनिक भंडारा होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री संत तुकोबारायाची गावातील प्रमुख मार्गान पालखी मिरवणूक होईल व रात्री ९ ते ११ श्री ह.भ.प अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे कीर्तन आणि ६ मार्च रोजी ह.भ.प गुरुराज महाराज देगलूरकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.
पंचक्रोशीतील भाविकांनी सप्ताहाचा व अन्नदानाचा लाभघ्यावा असे आवाहन श्री संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान सोनखेडच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis