तरुण पिढीने निर्व्यसनी आयुष्य जगून आई-वडिलांची सेवा करावी - प्रा. वसंत हंकारे
नांदेड, 01 मार्च (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या बापाने रयतेचे स्वराज्य निर्माण केले. प्राण गेला तरी छत्रपती संभाजीराजे यांच्यासारख्या सुपुत्राने या स्वराज्याला हात लावू दिला नाही. आजच्या तरुण पिढीनेही निर्व्यसनी आयुष्य जगून आई-वडिलांची से
तरुण पिढीने निर्व्यसनी आयुष्य जगून आई-वडिलांची सेवा करावी - प्रा. वसंत हंकारे


नांदेड, 01 मार्च (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या बापाने रयतेचे स्वराज्य निर्माण केले. प्राण गेला तरी छत्रपती संभाजीराजे यांच्यासारख्या सुपुत्राने या स्वराज्याला हात लावू दिला नाही. आजच्या तरुण पिढीनेही निर्व्यसनी आयुष्य जगून आई-वडिलांची सेवा करावी, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात केले, असे समजून शिवजयंती सार्थकी झाल्याची भावना मनामध्ये रुजेल, असे मत प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.

अर्धापूर शहरातील महात्माबसवेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शिवव्याख्यानात ते बोलत होते. ते म्हणाले, की तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी जर एखाद्या छपरी पोराच्या प्रेमात पडली तर त्या बापाला काय वेदना होतात, हे एक बापच समजू शकतो. शत्रूच्या महिलेलाही आपली बहीण आणि आई समजणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात तरुणांनी दुसऱ्याच्य बहिणीला पळवताना आई-वडिलांचे संस्कार आठवावेत, असे विचार प्रा. हंकारे यांनी व्यक्त केले. आई आणि बाप समजून घेताना बहुतांशी लोकांनी आपल्या अश्रूना वाट मोकळी करून दिली.

यावेळी नगराध्यक्ष वैशाली देशमुख यांच्या हस्ते व्याख्याते प्रा. हंकारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande