वाळूज येथे प्रभाग रचना जाहीर; सदस्य संख्या आता अठरा
छत्रपती संभाजीनगर, 01 मार्च (हिं.स.)। आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. त्या अनुषंगाने वाळूज ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात एकूण सहा प्रभागातील प्रभाग रचना ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. येथील ग्रामपंचायतचा कार्यकाळ
वाळूज येथे प्रभाग रचना जाहीर; सदस्य संख्या आता अठरा


छत्रपती संभाजीनगर, 01 मार्च (हिं.स.)।

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शासकीय

यंत्रणा कामाला लागली आहे. त्या अनुषंगाने वाळूज ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात एकूण सहा प्रभागातील प्रभाग रचना ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. येथील ग्रामपंचायतचा कार्यकाळ फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संपला. यामुळे सध्या प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच उपसरपंचांसह सर्व सदस्य कामकाज पहात आहेत. येथे पूर्वी सदस्य संख्या १७ होती व त्यातूनच सरपंचाची निवड होत होती. आता मात्र सरपंचाची थेट लोकांमधून निवड होणार असून अन्य सतरा सदस्यही निवडले जाणार आहे. त्यामुळे आता १८ कारभारी गावचे कामकाज पाहणार आहेत.

नगर पालिकेपाठोपाठ महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांची प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. यामुळे वाळूज ग्रामपंचायतच्या रचनेप्रमाणे एकूण सहा प्रभागात

सतरा सदस्य लोकप्रतिनिधी तसेच एक लोक नियुक्त सरपंच असा हा एकूण १८ लोकप्रतिनिधींचा समावेश राहणार आहे. यामध्ये फिरत्या क्रमांकावरून (रोटेशन प्रमाणे) मागील निवडणुकीतील एक नंबर प्रभागातील दोन जागा आता दोन नंबर प्रभागात गेल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande