कोल्हापूर: सावर्डे येथे नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार
कोल्हापूर, 01 मार्च (हिं.स.)शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत भरपूर योजना आहेत. त्या योजना केवळ सबसिडी पुरत्या मर्यादित न ठेवता शासकीय योजना अमलात आणून स्वतः उद्योगात वृद्धिंगत व्हा. असे प्रतिपादन माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले ते साव
सावर्डे येथे नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार


कोल्हापूर, 01 मार्च (हिं.स.)शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत भरपूर योजना आहेत. त्या योजना केवळ सबसिडी पुरत्या मर्यादित न ठेवता शासकीय योजना अमलात आणून स्वतः उद्योगात वृद्धिंगत व्हा. असे प्रतिपादन माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले ते सावर्डे ता. हातकणंगले येथील बौद्ध समाज येथे शिव-स्वामी सर्वहिताय बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर तर्फे आयोजित नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदी निवडून आलेल्यांचा सत्कार समारंभात बोलत होते.

माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर साहेब(संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांच्या हस्ते नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.मिणचेकर साहेब म्हणाले शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत भरपूर योजना आहेत. त्या योजना केवळ सबसिडी पुरत्या मर्यादित न ठेवता योजना अमलात आणून स्वतः उद्योगात वृद्धिंगत व्हा. माझे आई वडील नेहमी सांगायचे नोकरी करण्यापेक्षा उद्योगपती होऊन नोकरी देणारे व्हा. समाजातून मुले चांगले शिक्षण घेऊन आज डॉक्टर, वकील होत आहेत याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. या संस्थेने निवडून आलेल्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा विशेष सत्कार करून त्यांचा आदर सन्मान केला हे खरोखर कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

यावेळी आळते जिल्हा परिषद सदस्या डॉ. वर्षा सावर्डेकर, कुंभोज जि.प.सदस्या शितल यादव वहिनी, रुकडी जि.प.सदस्य अतिश शिंगे, कबनूर जि.प.सदस्य कुमार कांबळे, शिरोळ पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे, सावर्डे प.स.सदस्य माधुरी परिट, इचलकरंजी नगरसेवक अविनाश कांबळे, पल्लवी कदम (शैक्षणिक कार्य), डॉ. आदिनाथ तासगावकर ( पी एच डी पदवी) , डॉ. स्वजित दीक्षित( डॉक्टर पदवी) तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande