
सोलापूर, 01 मार्च (हिं.स.)मोहोळ येथील राष्ट्रीय महामार्गा वरील सरकारी जागेत अनधिकृत पुतळा बसवल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल झाला असुन एकुण बारा संशयीत निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरील सरकारी जागेत विनापरवाना अतिक्रमण करून अनधिकृतपणे पुतळा बसवल्या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता पर्यंत बारा संशयीत निष्पन्न करण्यात पोलीसांना यश आले आहे.
ता 22 फ्रेबुवारी रोजी पहाटे चार ते सकाळी सात वाजण्याच्या सुमारास, मोहोळ बस स्थानका समोरील राष्ट्रीय महामार्ग क्र.965 (टप्पा क्र.1 मोहोळ-वाखरी) मधील साखळी क्रमांक 20 च्या उजव्या बाजूस असलेल्या सरकारी जागेत काही अज्ञात व्यक्तींनी शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अतिक्रमण केले. या जागेत एका लोखंडी स्टँडवर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा अनधिकृतपणे बसवण्यात आला आहे.या प्रकरणी मुकेश कुमार सिंह वय 33 (उपप्रबंधक,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अंमलबजावणी युनिट) यांनी दिलेल्या तक्रारी वरून मोहोळ पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड