पुणे महापालिकेने तेरा महिन्यांत जप्त केले ५ हजार किलो प्लास्टिक
पुणे, 01 मार्च (हिं.स.)। शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल वापरावर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. त्यानुसार महापालिकेने जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या तेरा महिन्यांच्या कालावधीत १ हजार ४०८ जणांवर कारवाई करून ५
पुणे महापालिकेने तेरा महिन्यांत जप्त केले ५ हजार किलो प्लास्टिक


पुणे, 01 मार्च (हिं.स.)। शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल वापरावर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. त्यानुसार महापालिकेने जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या तेरा महिन्यांच्या कालावधीत १ हजार ४०८ जणांवर कारवाई करून ५ हजार १६८ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. या कारवाईत सात लाख २४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

पर्यावरणासाठी हानीकारक ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य शासनाने २०१८ पासूनच बंदी घातली आहे. यानंतर राज्यात तसेच पुणे महापालिकेनेही प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेल्या ‘यूज ॲण्ड थ्रो’च्या वापरातील प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंवर कारवाई सुरू केली आहे. महापालिका व राज्य प्रदूषण नियामक मंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या या कारवाया मध्यंतरी काहीशा थंडावल्या होत्या; परंतु केंद्र शासनाने संपूर्ण देशभरातच या प्लास्टिकवर निर्बंध लादल्याने महापालिका पुन्हा ॲक्शन मोडवर आली होती. त्यानंतर कारवाईचे प्रमाण घटल्याचे पाहायला मिळते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande