टी-20 विश्वचषक: दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर ५ विकेट्सनी विजय
नवी दिल्ली, 01 मार्च (हिं.स.)दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २०२६ च्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावलेला नाही. शेवटच्या सुपर ८ सामन्यात झिम्बाब्वेचा ५ विकेट्सने पराभव करून, दक्षिण आफ्रिकेने सलग तिसरा सामना जिंकला आणि भारताच्या गट १
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ


नवी दिल्ली, 01 मार्च (हिं.स.)दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २०२६ च्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावलेला नाही. शेवटच्या सुपर ८ सामन्यात झिम्बाब्वेचा ५ विकेट्सने पराभव करून, दक्षिण आफ्रिकेने सलग तिसरा सामना जिंकला आणि भारताच्या गट १ मध्ये सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले. गट टप्प्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेने सुपर ८ मधील तिन्ही सामने भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेकडून गमावले. यामुळे झिम्बाब्वेचा प्रवास संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेचा सामना आता ४ मार्च रोजी उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी होणार आहे.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. धावसंख्या ६६ पर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचे तीन फलंदाज बाद झाले. पण सिकंदर रझाने एकट्याने फलंदाजीची धुरा सांभाळली. सिकंदरने ४३ चेंडूत आठ चौकार आणि चार षटकारांसह ७३ धावा केल्या. शेवटी, क्लाइव्ह मदंडेने २० चेंडूत तीन चौकारांसह २६ धावा केल्या. यामुळे झिम्बाब्वेला सात बाद १५३ धावा गाठता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून क्वेना एमफाका आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

१५४ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही डळमळीत झाली. सलामीवीर क्विंटन डी कॉक शून्यावर बाद झाला, तर कर्णधार एडेन मार्कराम चार धावा घेऊन परतला. दक्षिण आफ्रिकेने १४ धावांत दोन आणि ४३ धावांत तीन विकेट्स गमवल्या होत्या.

रायन रिकल्टन २२ चेंडूंत चार षटकारांसह फक्त ३१ धावा करू शकला. पण डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरला. मिलरने १८ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह २२ धावा केल्या. ब्रेविसने १८ चेंडूंत चार षटकार आणि दोन चौकारांसह ४२ धावांची धमाकेदार खेळी केली. यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या समिप नेवे. जॉर्ज लिंडेने अखेर २१ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह ३० धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिकेने १७.५ षटकांत ५ बाद १५४ धावा केल्या आणि पाच विकेट्सनी विजय मिळवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande