
मिरपूर, 16 मार्च (हिं.स.)पाकिस्तानला मिरपूर (काश्मीर) येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशकडून ११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांत ५ बाद २९० धावा केल्या.तर पाकिस्तानचा डाव २७९ धावांवर आटोपला.
सलमान अलीने ९८ चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह १०६ धावा करत थोडाफार प्रतिकार केला. बांगलादेशकडून तन्झिद हसनने शतक झळकावले, १०७ चेंडूत सहा चौकार आणि सात षटकारांसह तेवढ्याच धावा काढल्या. बांगलादेशने पहिला सामना जिंकला होता आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने पुनरागमन केले. म्हणूनच, हा सामना मालिकेतील निर्णायक सामना होता, जो यजमानांनी जिंकला.
२९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही, त्यांनी फक्त १७ धावांत दोन विकेट्स गमावल्या होत्या. साहिबजादा फरहमान आणि मुआझ सदाकत प्रत्येकी सहा धावांवर बाद झाले. मोहम्मद रिझवानच्या रूपात संघाने तिसरी विकेट गमावली, जो फक्त चार धावा करू शकला.
अब्दुल समद आणि गाजी घौरी यांनी संघाला काही प्रमाणात स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संघाचा स्कोअर ६७ पर्यंत नेला. या स्कोअरवर गाझीला नाहिद राणाने बाद केले. ८२ च्या एकूण स्कोअरवर अब्दुल समदला मुस्तफिजूर रहमानने बाद केले. गाजीने २९ धावा आणि समदने ३४ धावा केल्या.
सलमान आणि शान मसूद यांनी सहाव्या विकेटसाठी ७९ धावा जोडल्या. सलमान अली आघाने आपले शतक पूर्ण केले. पण ४८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला आणि पाकिस्तानचा पराभव जवळजवळ निश्चित झाला. कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने शेवटच्या षटकात काही मोठे फटके मारून आपल्या संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने ३८ चेंडूत ३७ धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
त्याआधी, सैफ हसन आणि तन्झिदने बांगलादेशला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. आफ्रिदीने सैफला बाद करून पाकिस्तानला पहिला ब्रेकथ्रू दिला. सैफने ३६ धावा केल्या. नझमुल हुसेन शांतोला बाद करून हरिस रौफने बांगलादेशला दुसरा धक्का दिला. शांतोने २७ धावा केल्या. लिटन दास आणि तौहित ह्यदोये यांनी संघाची धावसंख्या १९४ वरून २६२ वर नेली. लिटन दास ४१ धावा करून बाद झाला. ४७ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रिशाद हुसेन बाद झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे