मृत्यूच्या अफवांमध्ये नेतान्याहू यांनी इराणी नागरिकांना दिल्या नवरोजच्या शुभेच्छा
जेरुसलेम, 17 मार्च (हिं.स.)।इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या मृत्यूच्या अफवांना पूर्णविराम देत इराणच्या जनतेसाठी एक खास संदेश जारी केला आहे. त्यांनी इराणमध्ये येणाऱ्या सणांच्या तसेच पर्शियन नववर्ष नवरोज निमित्त तेथील नागरिकांना श
मृत्यूच्या अफवांमध्ये नेतान्याहू यांनी इराणी नागरिकांना दिल्या नवरोजच्या शुभेच्छा


जेरुसलेम, 17 मार्च (हिं.स.)।इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या मृत्यूच्या अफवांना पूर्णविराम देत इराणच्या जनतेसाठी एक खास संदेश जारी केला आहे. त्यांनी इराणमध्ये येणाऱ्या सणांच्या तसेच पर्शियन नववर्ष नवरोज निमित्त तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असताना हा संदेश समोर आला आहे.

नेतन्याहू यांनी इराणच्या नागरिकांना धाडसी लोक असे संबोधले. ते म्हणाले, “दरवर्षीप्रमाणे यंदाही मी तुम्हाला सणांच्या शुभेच्छा देत आहे.” आपल्या संदेशात त्यांनी चहारशंबे सूरी या प्राचीन इराणी सणाचा उल्लेख केला, जो प्रकाश आणि अग्नीचा उत्सव मानला जातो.नेतन्याहू यांनी सांगितले की हा सण इराणच्या लोकांच्या त्या प्राचीन विश्वासाचे प्रतीक आहे की प्रकाश नेहमी अंधारावर मात करतो आणि चांगुलपणाचा वाईटावर विजय होतो. इस्रायली पंतप्रधानांनी हा संदेश इंग्रजी भाषेत दिला असून त्याला फारसी भाषेतील उपशीर्षके (अनुवाद) देखील देण्यात आली होती.

ते म्हणाले की यावर्षी या सणाला विशेष महत्त्व आहे. येत्या शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या नवरोजसाठीही त्यांनी शुभेच्छा दिल्या. नववर्ष इराणच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचे वर्ष ठरो आणि त्यांच्या आयुष्यात आशेची नवी सुरुवात घेऊन येवो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.नेतन्याहू यांच्या प्रकृतीबाबत विविध दावे केले जात असतानाच हा व्हिडिओ संदेश समोर आला. या संदेशाद्वारे त्यांनी केवळ आपली उपस्थिती दाखवून दिली नाही, तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर थेट इराणच्या जनतेशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande