
तेहरान , 17 मार्च (हिं.स.)।इराणी नौदलाचे कमांडर रिअर ऍडमिरल यांनी अमेरिकेविरुद्ध मोठी कारवाई करण्याची शपथ घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणी नौदल आपल्या ८७ नाविकांच्या मृत्यूचा बदला नक्की घेईल.हा हल्ला ४ मार्च रोजी झाला होता, जेव्हा अमेरिकन पाणबुडीने आंतरराष्ट्रीय पाण्यात गॉल्ले (श्रीलंका) किनाऱ्याजवळ इराणी नौदलाचे जहाज आयआरआयएस डेना बुडवले. या घटनेत किमान ८७ इराणी नाविकांचा मृत्यू झाला, तर काहींना वाचवण्यात आले.
इराणी नौदलाचे हे जहाज भारत सोबतच्या संयुक्त नौदल सरावात सहभागी झाल्यानंतर परत इराण कडे जात होते. इराणी टीव्हीच्या माहितीनुसार, रिअर अॅडमिरल शहराम इराणी यांनी मंगळवारी सांगितले, “आपण शत्रूच्या या गुन्ह्याला कधीही विसरणार नाही आणि आपल्या शहीदांच्या रक्ताचा बदला नक्की घेऊ.” त्यांनी इशारा दिला की शत्रूवर असा घातक हल्ला केला जाईल, जिथून त्याला कल्पनाही नसेल. इराणी नौदल प्रमुखांनी पुढे सांगितले, “आज आपण आपल्या प्रियजनांसाठी शोक व्यक्त करत आहोत, पण अल्लाहच्या कृपेने आपण शत्रूला गुडघ्यावर आणले आहे.”
त्यांनी या घटनेला ‘नरसंहार’ असे संबोधले आणि इराण या हल्ल्याला ‘घातक प्रत्युत्तर’ देईल, असे स्पष्ट केले.हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आधीपासूनच टोकाला पोहोचला आहे. द्वितीय महायुद्ध नंतर प्रथमच अमेरिकन पाणबुडीने एखाद्या शत्रू जहाजाला टॉर्पेडोने बुडवले, अशी ही घटना आहे.आयआरआयएस डेना हे एक फ्रिगेट होते, जे इराणी नौदलाचा महत्त्वाचा भाग होते. जहाजावरील नाविक इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू मध्ये सहभागी झाल्यानंतर भारतातून परत जात होते. हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या नौदलाने बचावकार्य सुरू केले, मात्र बहुतेक नाविक जहाजासहच बुडाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode