दिल्ली उच्च न्यायालयाचा हरदीप पुरी यांची मुलगी हिमयानीला मोठा दिलासा
नवी दिल्ली, १७ मार्च (हिंस.) दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची मुलगी हिमयानी पुरी हिचा जेफ्री एपस्टाईनशी संबंध जोडणारी भारतात प्रकाशित झालेला मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती मणी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने ही
दिल्ली उच्च न्यायाल


नवी दिल्ली, १७ मार्च (हिंस.) दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची मुलगी हिमयानी पुरी हिचा जेफ्री एपस्टाईनशी संबंध जोडणारी भारतात प्रकाशित झालेला मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती मणी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने ही सामग्री हटवण्याची मागणी करणाऱ्या मानहानीच्या याचिकेवर नोटीस बजावली आहे.

न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अशा प्रकारची सामग्री कोणत्याही प्रकारे प्रकाशित करण्यास किंवा प्रसारित करण्यास मनाई केली. हिमयानी पुरी यांनी दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की, जर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पोस्ट हटवल्या नाहीत, तर प्लॅटफॉर्म्स असा मजकूर काढून टाकतील किंवा त्यावरचा प्रवेश अवरोधित करतील.

न्यायालयाने म्हटले आहे की, हिमयानी पुरी यांच्या बाजूने प्रथमदर्शनी प्रकरण सिद्ध झाले आहे आणि अंतरिम दिलासा न दिल्यास त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ऑगस्टमध्ये निश्चित केली आहे. पुरी यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी म्हणाले की, त्यांच्या पक्षकाराची एक आर्थिक व्यावसायिक म्हणून जागतिक प्रतिष्ठा आहे, जिचे त्यांनी संरक्षण केले पाहिजे आणि त्यांच्यावरील आरोप पूर्णपणे खोटे, निराधार आणि द्वेषपूर्ण आहेत.

आपल्या दाव्यात, हिमयानी पुरी यांनी बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याबद्दल १० कोटी रुपयांची नुकसान भरपाई आणि अनेक संस्थांविरुद्ध मनाई हुकूम मागितला आहे. त्यांचा आरोप आहे की, त्यांना एपस्टाईन आणि त्याच्या गुन्ह्यांशी जोडण्यासाठी एक नियोजित आणि द्वेषपूर्ण ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यांनी आरोपींकडून बिनशर्त माफी आणि त्यांच्या पोस्ट मागे घेण्याचीही मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande