सातपूर पोलिसांच्या छाप्यात ३२० किलो मांस जप्त
320 kg of meat seized in Satpur police raid
सातपूर पोलिसांच्या छाप्यात ३२० किलो मांस जप्त


नाशिक, 02 मार्च (हिं.स.)।

परिसरातील ईएसआय रुग्णालयाच्या भींतीलगत मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री सुरू असल्याच माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पथकाने तत्काळ धाड टाकत पाच जणांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान सुमारे ३२० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सातपूर ईएसआय रुग्णालयाच्या भिंतीलगतच दिवसाढवळ्या गोमांस विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ धाव घेतली. या घटनास्थळावरून तीनशे वीस किलो गोमांस, दोन दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. गोमांस तपासणीसाठी पाठविण्यात आल आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे करत आहेत. घटनास्थळाच्या शेजारी देवीचे मंदिर असल्याने परिसरातीत नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले होते. ताब्यात घेतलेल्या स संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली मनपा आरोग्य विभागाने संबंधित ठिकाणाचा परवाना, स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande