
अकोला, 02 मार्च (हिं.स.)। शिवसेना ठाकरे पक्षाचे अकोला पूर्वचे शहरप्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनावर रात्रीच्या सुमारास हल्ला करण्यात आला होता..ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.. याप्रकरणी काही तासातच अकोल्यातील सिव्हिल पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.. दरम्यान कराळे यांच्या वाहनावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे कारण नेमकं समजू शकले नाही.. चौघांनी आपल्या वाहनावर हातोडा आणि तलवारीने हल्ला केल्याचं तक्रारीत म्हटले आहे.. रात्री हल्ला झाल्यानंतर आमदार नितीन देशमुख हे आपल्या समर्थकांसह पोलिस ठाण्यात होते.. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे..अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हर्षल दिलीप मंडलीक,चेतन विजय खंडारे, सागर संतोष इंगळे आणि वैभव दिनेश गोपनारायण यांचा समावेश आहे.. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे