२ लाख ११ हजारांची बैलजोडी,गावात डीजेच्या तालावर जल्लोषात मिरवणूक
छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)। गंगापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव येथील प्रगतशील शेतकरी नवनाथ पाटील थोरात यांनी तब्बल २ लाख ११ हजार रुपये मोजून बैलजोडी खरेदी केली. नव्याने आणलेल्या बैलांचे गावात डीजेच्या तालावर वाजतगाजत स्वागत करण्यात आले.
२ लाख ११ हजारांची बैलजोडी,गावात डीजेच्या तालावर जल्लोषात मिरवणूक


छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)।

गंगापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव येथील प्रगतशील शेतकरी नवनाथ पाटील थोरात यांनी तब्बल २ लाख ११ हजार रुपये मोजून बैलजोडी खरेदी केली. नव्याने आणलेल्या बैलांचे गावात डीजेच्या तालावर वाजतगाजत स्वागत करण्यात आले.

पारंपरिक पद्धतीने पूजन करून सजवलेल्या बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानासोबत पारंपरिक बैलजोडीचे महत्त्व कायम असल्याचे थोरात यांनी सांगितले. या अनोख्या स्वागत सोहळ्याची परिसरात चर्चा रंगली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande