निलंगा येथे मटका जुगार अड्ड्यावर छापा
लातूर, 02 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या विशेष पथकाने निलंगा शहरात कारवाई करत मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून
पोलीस कारवाई


लातूर, 02 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या विशेष पथकाने निलंगा शहरात कारवाई करत मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेतले असून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

सविस्तर माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांच्या विशेष पथकातील अधिकारी पो.उप.नि. आयुब शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी निलंगा शहर परिसरात अवैध धंद्याबाबत माहिती घेत होते.

दरम्यान दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, निलंगा येथील पोस्ट ऑफिसच्या उजव्या बाजूस असलेल्या दुकानात काही इसम नागरिकांकडून पैसे घेऊन “कल्याण मटका” नावाचा जुगार खेळत व खेळवित आहेत. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांना सोबत घेत नियोजनबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी छापा टाकला.दुपारी सुमारे 3.45 वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली असता त्या ठिकाणी दोन इसम जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे

1)तानाजी गोरोबा विटुबोने (रा. गु-हाळ, ता. निलंगा), 2)माजिद अब्दुल गनी खडके (रा. शिवाजी नगर, निलंगा) अशी सांगितली.

पंचासमक्ष आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून मटका जुगार चालविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आकड्यांच्या चिठ्ठ्या, वही तसेच रोख रक्कम मिळून आली. या कारवाईत जप्त करण्यात आला मटका जुगारातील आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या, रोख रक्कम, दोन मोबाईल फोन असा एकूण ₹30,790/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांकडून पैसे स्वीकारून “कल्याण मटका” जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या जुगार व्यवसायामागे इतर काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नसून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अन्वये पोलीस ठाणे निलंगा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घोरपडे हे करीत आहेत. आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande