अकोला: महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी भाजपचे विजय अग्रवाल
अकोला, 02 मार्च (हिं.स.)।अकोला महापालिकेची स्थायी समितीच्या सभापती पदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे विजय अग्रवाल यांची निवड झाली आहे.. महापालिकेच्या स्थायी सभापतीपदासाठी भाजपप्रणित शहर सुधार आघाडीकडून माजी महापौर विजय कमलकिशोर अग्रवाल तर काँग्रेसक
Photo


अकोला, 02 मार्च (हिं.स.)।अकोला महापालिकेची स्थायी समितीच्या सभापती पदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे विजय अग्रवाल यांची निवड झाली आहे.. महापालिकेच्या स्थायी सभापतीपदासाठी भाजपप्रणित शहर सुधार आघाडीकडून माजी महापौर विजय कमलकिशोर अग्रवाल तर काँग्रेसकडून मोहम्मद फजलु अब्दुल करीम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली होती. यामुळे स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शहर सुधार आघाडीविरुद्ध काँग्रेस यांच्यात सरळ लढत पाहायला मिळाली आहे. मात्र, काँग्रेसकडे पुरेसे पक्षीय बलाबल नसल्याने शहर सुधार आघाडीचे विजय अग्रवाल यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. दुसरीकडे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद तसेच चारपैकी तीन प्रभाग समिती सभापतीपदी शहर सुधार समितीकडे तर एका सभापतीपद काँग्रेसला मिळाले आहे.

सभापती पदांसाठी निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आज सकाळी ११ वाजतापासून स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा मीना उपस्थित होत्या. या सभापती पदांसाठी नामनिर्देश पत्र दाखल झाले होते. त्यामध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी शहर सुधार आघाडीकडून भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे मोहम्मद फजलू अब्दुल करीम यांचा अर्ज दाखल होता. अपेक्षेप्रमाणे शहर सुधार आघाडीच्या नऊ स्थायी समिती सदस्यांनी विजय अग्रवाल यांना मतदान केल्याने ते विजयी झाले. त्याचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवाराला सहा मते मिळाली. त्यांना काँग्रेस चार, वंचित आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक मत मिळाले. 'एआयएमआयएम' च्या सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली. स्थायी समिती सभापतीपदावर विजय अग्रवाल विजय झाल्याचे जाहीर करताच त्यांच्या समर्थकांसह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेत फटाके फोडून एकच जल्लोष केला.

महिला व बालकल्याण सभापतीपदी शहर सुधार आघाडीच्या आरती घोगलीया, पूर्व प्रभाग समिती सभापतीपदी रश्मी अवचार, पश्चिममध्ये राजेश्वर धोटे, दक्षिणमध्ये शहर सुधार आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पूजा गावंडे आणि काँग्रेसच्या जैनब बी शेख इब्राहिम यांची उत्तर प्रभाग समिती सभापतीपदी निवड झाली आहे. यावेळी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा आदी उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande