
सोलापूर, 02 मार्च (हिं.स.)। प्रणिती शिंदे यांच्या जिल्हा नियोजन मंडळ तसेच जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत, ग्रामस्थांच्या मागणीनुसार मोहोळ तालुक्यातील मौजे बेगमपूर येथील मच्छी मार्केटमध्ये सिमेंट काँक्रीट करण्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
या कामासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सदर भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या विकासकामामुळे मच्छी विक्रेते व ग्रामस्थांना स्वच्छता, सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. तसेच बाजारपेठेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. यावेळी तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, सौ. उमाश्री सचिन भोई, सरपंच संतोष सोनवणे, उपसरपंच केशव बापू काकडे, सदस्य महेश जाधव, रामेश्वर सुरवसे, आप्पासाहेब पाटील, इस्माईल मुजावर, फिरोज पठाण, बंदेनवाज फुलारी, अशपाक पटेल, इरफान जहागिरदार, अझरुद्दीन फुलारी, दत्तात्रेय मल्लाव, बापू दयाराम भोई, अमित पवार, दावल शेख, आकाश भोई, सचिन भोई, अतुल भोई, महादेव शेवाळे, आरिफ पठाण, सादिकभाई तांबोळी, नदीम तांडेल, अनिस इस्राईल, साहिल तांबोळी, मोहसीन पठाण, सलीम आतार, इरफान बागवान यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या कामासाठी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानत, भविष्यातही अशाच विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली.
--------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड