
मुंबई, 02 मार्च (हिं.स.) - महाकालेश्वर आणि उत्तरेकडील इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारतीय रेल्वे भारत गौरव ट्रेन चालवणार आहे. या दौऱ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) करेल. महाकालेश्वर आणि उत्तर भारत दर्शन यात्रा ही दिनांक २५.०४.२०२६ ते ०५.०५.२०२६ पर्यंत १० रात्री/११ दिवसांची टूर पॅकेज आहे. यामध्ये उज्जैन - मथुरा - हरिद्वार - ऋषिकेश - अमृतसर - वैष्णोदेवी आणि परतीच्या प्रवासाचा समावेश आहे.
‘भारत गौरव एक्सप्रेस’ द्वारे महाकालेश्वर आणि उत्तर भारत दर्शन यात्रा दिनांक २५.०४.२०२६ रोजी दौंड स्थानकावरून ८.०० वाजता सुटेल आणि दिनांक ०५.०५.२०२६ रोजी दौंड स्थानकावर रात्री २०.३० वाजता परत येऊन थांबेल.
मथुरा, हरिद्वार, अमृतसर आणि वैष्णोदेवी येथे मुक्काम करून प्रवासी पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि उज्जैन येथे चढू आणि उतरु शकतात.
संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ३ वातानुकूलित तृतीय, ७ शयनयान, २ पॉवर कार आणि १ पॅन्ट्री कार (१४ एलएचबी रेक)
पार्श्वभूमी :
भारत सरकारने संकल्पित केलेल्या 'देखो अपना देश' आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उत्कृष्ट पर्यटन संकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, रेल्वे मंत्रालय आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्षेत्रात भारताला एक डेस्टिनेशन म्हणून सादर करण्यासाठी देशाच्या विविध भागांमधून 'भारत गौरव पर्यटन गाड्या' चालवत आहे. या संकल्पना- आधारित गाड्या देशांतर्गत पर्यटकांसह आंतरराष्ट्रीय पर्यटकांना भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा दाखवण्यासाठी संकल्पित केल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी