
छत्रपती संभाजीनगर, 02 मार्च (हिं.स.)।
जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती निवडीसाठी पीठासीन अधिकारी व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.१० मार्च रोजी निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
सोयगाव येथे एकनाथ रंगाळे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), सिल्लोड येथे नीलेश अपार (सर्वसाधारण महिला), कन्नड येथे संतोष गोरड (सर्वसाधारण महिला), फुलंब्री येथे नीलम बाफना (सर्वसाधारण) यांची नियुक्ती झाली आहे. खुलताबाद येथे सुचिता शिंदे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), वैजापूर येथे अरुण जहऱ्हाड (अनुसूचित जाती महिला), गंगापूर येथे विजय राऊत (सर्वसाधारण), संभाजीनगर येथे व्यंकट राठोड (सर्वसाधारण) आणि पैठण येथे प्रवीण फुलारी (सर्वसाधारण महिला) पीठासीन अधिकारी असतील. १० मार्च रोजी निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis