अखेर चंद्रपूरकरांनी केला लावणी नृत्याचा विश्वविक्रम
चंद्रपूर, 02 मार्च (हिं.स.)। अखेर चंद्रपूरकरांनी लावणी नृत्याचा विश्वविक्रम केला आहे. उत्कृष्ट महिला मंच आणि सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस संस्थेद्वारे आयोजित या कार्यक्रमात चांदा क्लब मैदानावर २ हजार ४३२ महिला आणि मुलींनी सलग २० मिनिटे लावणी नृत
अखेर चंद्रपूरकरांनी केला लावणी नृत्याचा विश्वविक्रम,


चंद्रपूर, 02 मार्च (हिं.स.)।

अखेर चंद्रपूरकरांनी लावणी नृत्याचा विश्वविक्रम केला आहे. उत्कृष्ट महिला मंच आणि सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस संस्थेद्वारे आयोजित या कार्यक्रमात चांदा क्लब मैदानावर २ हजार ४३२ महिला आणि मुलींनी सलग २० मिनिटे लावणी नृत्याविष्कार दाखविला.

चंद्रपूरकर महिलांनी आधीच्या विश्वविक्रमाला मोठ्या फरकाने मागे टाकले. आधीचा विक्रम १ हजार ३२६ संख्येचा होता. उत्कृष्ट महिला मंच द्वारे आयोजित कार्यक्रमाने चंद्रपूरकर महिलांमध्ये अनोखी ऊर्जा बघायला मिळाली. गिनीज विश्वविक्रमाच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष कार्यक्रमात विक्रमाचे प्रमाणपत्र देत यावर शिक्कामोर्तब केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande