पाटोदा नगरपंचायतीत काँग्रेस नगरसेवकाला सभापतीपद
बीड, 02 मार्च (हिं.स.)। पाटोदा नगर पंचायतीत भाजपने काँग्रेसचे नगरसेवक उमर मकराणी यांची बांधकाम सभापतीपदी बिनविरोध निवड करत राजकीय संधी दिली आहे. विषय समिती सभापती पदाच्या निवडीत काँग्रेसच्या नगरसेवकाच्या विरोधात दुसरा अर्ज न आल्याने त्यांची बिनव
पाटोदा नगरपंचायतीत काँग्रेस नगरसेवकाला सभापतीपद


बीड, 02 मार्च (हिं.स.)।

पाटोदा नगर पंचायतीत

भाजपने काँग्रेसचे नगरसेवक उमर मकराणी यांची बांधकाम सभापतीपदी बिनविरोध निवड करत राजकीय संधी दिली आहे. विषय समिती सभापती पदाच्या निवडीत काँग्रेसच्या नगरसेवकाच्या विरोधात दुसरा अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पाटोदा नगर पंचायतीत विषय समितीचे सभापती निवडले गेले.

नगर पंचायतीत भाजपकडे बहुमत असतानादेखील काँग्रेसच्या नगरसेवकाने सभापती पदासाठी अर्ज दाखल केला आणि त्याला सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी अनुमोदन दिले.

पाटोदा नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती पदासाठी काँग्रेसचे उमर मकराणी यांचा एकच अर्ज आला होता. त्या अर्जाच्या विरोधात दुसरा अर्ज आला नाही. म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकाची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

पाटोदा नगरपंचायतीत पक्षीय बलाबल पाहिले असता, अपक्ष व भाजप मिळून १५ नगरसेवक आहेत. त्यामुळेच नगरपंचायतीवर भाजपची सत्ता आहे. उर्वरित काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक नगरसेवक असे संख्याबळ आहे. सभापतीपदाच्या निवडीत भाजपकडे पुरेसे संख्याबळ असतानाही काँग्रेस नगरसेवकाविरोधात अर्ज दाखल का केला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande