परभणीत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पीककर्ज व कृषी कर्जाचा सविस्तर आढावा
परभणी, 02 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील शेतकरी व लघुउद्योजकांना वेळेत आणि सुलभ कर्जपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सोमवारी (दि. २) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पीककर्ज व कृषी कर्जाचा सविस्तर आढावा


परभणी, 02 मार्च (हिं.स.)।

जिल्ह्यातील शेतकरी व लघुउद्योजकांना वेळेत आणि सुलभ कर्जपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सोमवारी (दि. २) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेत आयोजन करण्यात आले.

बैठकीस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, विविध राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांचे व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी, नाबार्डचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील कर्ज वितरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः पीककर्ज, कृषी कर्ज आणि प्राधान्य क्षेत्रातील कर्जवाटपाबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना वेळेत, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी बँकांना दिले.

परभणी जिल्ह्यातील शेतकरी, लघुउद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना मजबूत आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी प्रशासन व बँकिंग क्षेत्राने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीमुळे जिल्ह्यातील कर्ज वितरण प्रक्रियेला गती मिळून शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होईल व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande