
नवी दिल्ली, 02 मार्च (हिं.स.)। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी कर्मचाऱ्यांच्या पीएफ ठेवींवरील व्याजदर ८.२५% कायम ठेवला आहे. या निर्णयाचा देशभरातील ३१ कोटींहून अधिक सदस्यांना फायदा होईल.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील आर्थिक वर्षात, ईपीएफओने ८.२५ टक्के व्याजदर दिला होता. त्यापूर्वी, २०२२-२३ या आर्थिक वर्षात हा दर ८.१५ टक्के होता, तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात तो ८.१ टक्के या चार दशकांच्या नीचांकी पातळीवर आला होता.
भारतीय मजदूर संघाचे (बीएमएस) उत्तर विभागातील संघटना सचिव पवन कुमार यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) च्या पीएफ ठेवींवरील व्याजदर ८.२५% ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, देशातील लाखो पगारदार कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule